शबनम न्यूज प्रतिनिधी
पुणे – सामाजिक बांधिलकी जपत या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या अनुषंगाने होप फाऊंडेशन तर्फे दत्तक घेतलेल्या अनाथ मुलांच्या सोबत स्वप्निल खेलवाडे यांची कन्या स्वरा या छोट्या चिमुकली चा वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात आले.
वाढदिवस हा अविस्मरणीय व्हावा म्हणून या छोट्या चिमुकल्यांनी वाढदिनाचे गाणे गाऊन कार्यक्रमात स्नेह व कृतज्ञतेचे वातावरण निर्माण केले. या चिमुकल्यांची कृतज्ञतेची जाण पाहून कार्यक्रमास उपस्थितीत असलेल्या सर्व पाहुण्यांचे डोळे टिपले…
या कार्यक्रमास स्वप्निल खेलवाडे, शुभम मयेकर, बाबाजी माळकर व दिगंबर पाटील उपस्थित होते…
Advertisement
या कार्यक्रमाचे आयोजन होप फाऊंडेशन पुणे विभाग प्रमुख व पोलीस मित्र विनायक खोत यांनी केले होते...