शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. उत्तर कोकणापासून उत्तर दिशेला हवेची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. जम्मू ते उत्तर पाकिस्तान पर्यंत पश्चिमी विक्षेप तयार आहे. त्यामुळे दक्षिण हरियाणासह लगत परिसरात हवेच्या वरील स्तरात हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
तसेच उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्याने आग्रही दिशेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा मध्य भारतात संयोग होऊन मध्य भारत, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार मध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे, तर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पाडण्याचा अंदाज आहे.