चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा संकल्प
पिंपरी महापालिकेत पुन्हा भाजप ची सत्ता, शहर भाजपा पदाधिकारी यांचा निर्धार
पिंपरी, पुणे (दि. २७ जून २०२३) आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षात सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकास प्रकल्प राबविण्यात आले. या विकास प्रकल्पांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ देशभरातील सर्व थरातील महिला, कष्टकरी कामगार यांना झाला आहे. या विविध विकास माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि राज्यात “मोदी@9” हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत चिंचवड विधानसभा तसेच मावळ लोकसभा मतदार संघात हे अभियान राबविण्यात आले. या द्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी घरोघरी संपर्क साधला असून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याचा भाजपाचा संकल्प आहे आगामी काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड मनपावर भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास आमदार आश्विनिताई लक्ष्मणभाऊ जगताप यांनी व्यक्त केला.
चिंचवड येथे मंगळवारी (दि. २७ जून) योजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. अश्विनी जगताप बोलत होत्या, यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप, “मोदी@9” चे चिंचवड विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, “मोदी@9” पत्रकार परिषद संयोजक हर्षल ढोरे, प्रदेश सदस्य संतोष कलाटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष संकेत बांधे, महिला मोर्चा शहर अध्यक्षा उज्वलाताई गावडे, “मोदी @9” अंतर्गत अभियानांचे संयोजक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, शशिकांत कदम, सिद्धेश्वर बारणे, राजेंद्र चिंचवडे, भाजपा सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आ. आश्विनी जगताप यानी सांगितले कि, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यकलाला तक वर्ष पूर्ण झालेले आहेत. या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत सर्व सामान्य नागरिकांना लाभदायक ठरतील आशा अनेक चांगल्या योजना त्यांनी देशवासीयांकरिता आणल्या आणि त्या प्रभावीपणे राबविल्या आहेत ही सर्व विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत याकरता भारतीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशातील सर्व लोकसभा विधानसभा क्षेत्रामध्ये महा जनसंपर्क अभियान व विविध कार्यक्रम म्हणजेच मोदी @9) राबविण्यात येत आहेत.
चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये “मोदी@9” अंतर्गत अनेक कार्यक्रम राबविले गेले १८ १७ जून रोजी सोशल मीडिया वरती प्रभाव असलेल्या व्यक्ती म्हणजेच सोशल मीडिया इंफ्ल्युसर यांचे संमेलन चिचवड विधानसभा क्षेत्रातील गोविंद गार्डन हॉलमध्ये घेण्यात आले या संमेलनाला चिंचवड विधानसभा क्षेत्रातले ज्याना हजारों फॉलोवर्स आहेत अशा सोशल मीडिया इंफ्ल्युसरना बोलविण्यात आले होते व त्यांचे अनुभव देखील सर्व उपस्थितानी ऐकले.
१८ जून रोजी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी यांचे एक मोठे संमेलन चिंचवड विधानसभेत घेण्यात आले. या संमेलनाला माजी राज्यमंत्री व मावळ लोकसभा “मोदी@9” संयोजक बाळासाहेब भेगडे यांसह चिंचवड विधानसभेतील सर्व प्रमुख उपस्थित होते.
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी
यांच्या माद्यमातून 15 पेक्षा मोठे कार्यक्रम योग दिनानिमित्त झाले.
सर्व कार्यक्रम हे विधानसभा स्तरावर झाले उद्या चिंचवड विधानसभा क्षेत्रातील सर्व सन्माननीय नगरसेवक सर्व शक्ती केंद्रप्रमुख सर्व चिंचवड विधानसभा क्षेत्रात येणारे जिल्हा पदाधिकारी मंडल पदाधिकारी यांची एकत्रित एक टिफिन पार्टी कार्यक्रम होणार आहे.
त्याचबरोबर घरोघरी संपर्क अभियान याकरिता भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभेच्या वतीने घरोघर संपर्क अभियान पक्षाचे सर्व नगरसेवक सर्व शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे या अभियानात विधानसभेतील एक लाख कुटुंबापर्यंत संपर्क करून केंद्र सरकारची कामगिरी असलेले एक पत्रक पोहचवण्यात येणार आहे यानिमित्ताने चिंचवडमधील सर्व कुटुबांचा एक व्यापक संपर्क देखील होणार आहे.
०९ जून रोजी मावळ लोकसभेतील पक्षाच्या सर्व मोर्च्या व आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांचे एकत्रित संयुक्त
मोर्चा समेलन तळेगाव दाभाडे येथे झाले.
२० रोजी लोकसभेतील व्यापाऱ्यांचे संमेलन लोणावळा येथे झाले.
२४ जून रोजी मावळ लोकसभा मतदारसंघात भेगडे येथे केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेबजी दानवे व आमदार माजी राज्यमंत्री भेगडे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार उमाताई खापरे, आदीसह मावळ लोकसभेतील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हा पदाधिकारी उपस्थितीत भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
जून रोजी मावळ लोकसभेतील पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये जनसंघापासून काम करणारे ज्येष्ठ कार्यकत्यांचे संमेलन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत पार पडले
२६ जून रोजी मावळ लोकसभेतील बुद्धिवंत नागरिकांचे समेलन वडगाव मावळ येथे संपन्न झाले. या संमेलनाला राज्याचे भारतीय पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.
आज २७ जून रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सर्व बूथप्रमुखांना व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून संपर्क केला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करण्यासाठी सर्वांनी कामास लागावे आशे आवाहन केले अशी ही माहिती आ. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांनी यावेळी दिली.