शबनम न्यूज , प्रतिनिधी :
1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे वनाज ते पिंपरी मेट्रो उदघाटन कार्यक्रमवर मनसे वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे पिंपरी चिंचवडला त्याचा फायदा काय ? असा हि प्रश्न मनसे वतीने विचारण्यात आला आहे तसेच पिपंरी ते निगडी मेट्रोचे काम लवकर सुरु करण्याची मागणी मनसे वतीने करण्यात आली आहे.मेट्रोचे काम निगडी ते पिपरी लवकरच काम चालु करु असे – महा मेट्रोचे अध्यक्ष – श्रावण हर्डीकर यांनी सांगितले
या बाबत चे निवेदन मनसे वतीने महा मेट्रोचे अध्यक्ष – श्रावणजी हर्डीकर यांना देण्यात आले. निवेदनात खालील प्रमाणे नमूद करण्यात आले आहे पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व नागरिकांच्या मागणी नुसार गेले अनेक दिवसापासुन पिंपरी ते निगडी मेट्रो चे काम पुर्ण करण्यात यांवे अशी मागणी वेळो वेळी होत आहे , या विषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांच्या वतिने वेळो वेळी आंदोलन करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कामगार वर्ग , महिला वर्ग , विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे शहरात विविध कामासा,ठी शिक्षणासाठी पुणे शहरात प्रवेश करतो परंतु हा मेट्रोमार्ग अर्धवट अवस्थेमध्ये असल्यामुळे शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, तरी आपण लवकरात लवकर कामाला सुरवात करून शहरातील नागरीकांना दिलासा द्यावा अशी आपणास नम्र विनंती.
आम्ही आपणांस मागिल वेळेस दिनांक ०५/०१/२०२३ रोजी दिलेले पत्र याला आपण दिनांक ०६/०१/२०२३ रोजी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये आपण असे नमूद केले आहे कि, महामेट्रोने पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रोमार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) राज्य शासनाला सादर केला असून, राज्य शासनाने सदरी अहवाल गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA/GOI) कडे मान्यतेसाठी पाठवला आहे.
आपल्या पत्रानुसार सद्यस्थितीत सदरील प्रस्ताव केंद्रशासनाच्या विचाराधीन आहे असे आपण नमूद केले आहे, तरी आपण पुढील प्रक्रियेचा आवश्यक तो पाठपुरावा करून आम्हास लवकरात लवकर खालील गोष्टींचा तपशील द्यावा अशी आपणास नम्र विनंती.
१) पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रोमार्गिका कधीपर्यंत सुरु होणार?
२) सदर प्रकल्प एवढ्या दिवसापासून प्रलंबित असण्याचे कारण.
३) सदर प्रकल्पासंदर्भात आपण वेळोवेळी राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याचे तपशील.
४) थोड्याच काळापूर्वी राज्य शासनाचे तसेच केंद्र शासनाचे आर्थिक अंदाजपत्रक जाहीर झालेले असून त्यामध्ये महामेट्रो साठी जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीबद्दल तपशील तसेच त्यातील पिंपरी ते निगडी मेट्रोमार्गिके साठी केलेली आर्थिक तरतूद.
या वेळी सचिन चिखले – मनसे शहरअध्यक्ष – रुपेश पटेकर – सचिव मनसे , दत्ता देवतरासे – विभाग अध्यक्ष , सचिन शिगाडे – माथाडी अध्यक्ष , किरणजी गवळी उपस्थित होते.