शबनम न्युज | पुणे
पुणे शहरात डोळ्याचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. शहरातील हजारो नागरिक मोठ्या प्रमाणात या डोळ्याच्या आजाराच्या साथीने त्रस्त आहेत. खाजगी आणि सरकारी रुग्णालयात डोळे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. डोळे येणे हा खूप गंभीर स्वरूपाचा आजार समजला जात नाही, पण तो संसर्गजन्य असल्याने डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांवर त्याचा परिणाम होत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत प्रत्येक वयोगटात हा आजार दिसून येत आहे.
हा आजार बरा व्हायला बराच कालावधी लागत असतो. या आजाराचा संसर्ग हवेतून पसरत नसून तो स्पर्शातून पसरतो. डोळे येण्याची लक्षणे प्रथमता एका डोळ्यात दिसतात आणि नंतर दोन्ही डोळ्यांनी त्याचा त्रास होण्यास सुरुवात होते. हा संसर्ग हवेतून नाही तर स्पर्शातून पसरतो, यामध्ये डोळे लाल होतात. त्यामधून चिकट स्त्राव येतो, कदाचित त्यामुळे हलकासा तापही येऊ शकतो. हे इन्फेक्शन बॅक्टेरियल (जिवाणू) वायरल विषाणू किंवा एलर्जी यापैकी एका कारणामुळे होऊ शकतो.
- काय आहे लक्षणे –
- डोळे हलके लाल होऊ लागतात.
- पाण्यासारखा चिखट द्रव्य येतो
- डोळ्यांवर सूज येते
- डोळ्यातून पाणी यायला लागते
- खाज येऊ लागते
- सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात