शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमध्ये ‘सायबर लॉ मधील कारकीर्द ‘ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. ‘दीक्षारंभ’उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कॉलेजच्या ‘एडव्हान्स्ड एक्स्प्लोरेशन ट्रेनिंग ऑफ इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अँड सायबर लॉ सेल’ने त्यासाठी पुढाकार घेतला.
पुणे पोलीस गुप्तचर विभागच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त पंकज देशमुख,सहायक आयुक्त एस.एम.बाबर,एड.वैभव साळुंखे,न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे,उपप्राचार्य डॉ.ज्योती शर्मा,डॉ राजलक्ष्मी वाघ यांनी मार्गदर्शन केले.४,५ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या इंडक्शन कार्यक्रमात हे मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम एरंडवणे कॅम्पस मध्ये झाला. ‘विद्यार्थ्यांनी तांत्रिक दृष्ट्या प्रगत ज्ञान मिळवावे,सायबर गुन्ह्यांची कार्यपद्धती अभ्यासून जनजागृती घडवून आणावी,सक्षम विधी सल्लागार म्हणून कारकीर्द घडवावी’,असे प्रतिपादन पंकज देशमुख यांनी केले.विद्यार्थी,प्राद्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.