शबनम न्युज | प्रतिनिधी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुल डुडुळगाव, (आळंदी) जि.पुणे. या ठिकाणी शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनिअर कॉलेज, राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय व आदित्य इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षि शिवनेर भूषण स्व. विलासराव तांबे यांच्या ७६ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संजीव कांबळे यांनी शिक्षणमहर्षि स्व. विलासराव तांबे हे कसे ध्येयवेडे शिक्षक आणि शिक्षण प्रचारक होते यावर भाष्य करीत ‘महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या निर्मिती बाबतचा इतिहास सविस्तर मांडला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मा.डॉ.प्रिया जगताप सल्लागार व प्रशिक्षक – शिक्षण आणि विकास यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर भाष्य करतांना प्रत्येक काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तसेच मानवी मूल्यांची सामाजिक जीवनात असणारी आवश्यकता व्यक्त केली. सद्यस्थितीतील मोबाईल संस्कृतीवर भाष्य करतांना मोबाईल अपडेट करण्यापेक्षा स्वतःला अपडेट केले पाहिजे. तसेच तरुण वर्गांसाठी, निरोगी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तसेच विद्यार्थ्यांनी आपली दिनचर्या निश्चित करून ‘वाचन संस्कृती’ जोपासली पाहिजे आणि इंग्रजी या आंतरराष्ट्रीय भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे,खजिनदार- मा.श्री. मयुर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी मा. श्री.राजीव पाटील -प्रशासकीय सल्लागार श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ. डॉ.प्रमोद इंगळे,प्राचार्य – ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, श्री.अतुल पानसरे, मुख्याध्यापक – राजा शिवछत्रपती विद्यालय, सौ. शितल पाटील, मुख्याध्यापिका- आदित्य इंटरनॅशनल स्कूल तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्मिता वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.पांडुरंग मिसाळ यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदान झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली .