शबनम न्युज | प्रतिनिधी
फोरम ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे आज एमआयडीसी येथे उद्योजकांना भेडसावणाऱ्या भांडवलाच्या समस्येबाबत बँक प्रतिनिधींबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या अध्यक्ष श्री अभय भोर यांनी मांडल्या उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या कर्जाबाबत बँक अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि उद्योजकांना सहज आणि सोप्यारीत्या कशाप्रकारे भांडवल उभारणे करता येऊ शकते याबाबत बँक अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली तसेच आगामी काळात होणाऱ्या विविध जसे की इलेक्ट्रिकल व्हेईकल वर आधारित उद्योगांसाठी कर्ज योजनेबाबत चर्चा करण्यात आली सदर बैठक फिटवेल मोबेलिटी या कंपनीत आयोजित करण्यात आलेली होती.
या ठिकाणी ठाणे जनता बँक इंडस्लंड बँक आय सी आय सी बँक अशा अनेक बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी स्टार्टअप उद्योगासाठी तसेच उद्योगांना शासनातर्फे मिळणाऱ्या सबसिडी विषयी चर्चा करण्यात आली पुढील काळामध्ये सर्व बँकांना एकत्रित करून उद्योजकांना सहज आणि सोप्यारीत्या कर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी असोसिएशन तर्फे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज सांगितले यावेळी उपस्थित फिटवेल मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड सौ शीला शिरोळे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेंद्र रेदासानी जनरल मॅनेजर ,संजू तिवारी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन समन्वयक इंडसइंड बँक विशाल,सोनवणे नीलम कुमारी,ठाणे जनता सहकारी बँक मंदार भावे ब्रांच मॅनेजर सुमित पडसाळगे , इक्विटस. स्मॉल फायनान्स बँक सागर यादव राकेश मोदी इत्यादी उपस्थित होते