शबनम न्यूज | पिंपरी
भोसरी फुलेनगर परिसरात आनंद शिधा या शासनाच्या योजनेचा शिधावाटप शुभारंभ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सतीश लांडे पाटील यांच्या एस पी लांडे फ 65 महात्मा फुले नगर रेशनिंग दुकानात करण्यात आला.
येणाऱ्या गणेशोत्सव आनंदात साजरा करण्यासाठी शासनाने ही योजना कार्यनीत केली असून याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी आनंदाचा शिरा वाटप करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला होता. गणेशोत्सव अवघ्या आठवडाभर येऊन ठेपला आहे तत्पूर्वी आनंदाचा शेजारचे वाटप एक किलो चणाडाळ, एक किलो रवा, एक किलो पाम तेल आणि एक किलो साखर आदींचा आनंदाचा शिधे मध्ये समावेश आहे.
शंभर रुपये एवढ्या किमतीत या सर्व वस्तू दिल्या जाणार आहेत. यामध्ये अंत्योदय अन्न योजना आणि अन्नसुरक्षा योजनेतील ज्यांच्या कार्डाची ऑनलाईन नोंद आहे. त्यांनाच आनंदाचा शिधा मिळणार आहे. यावेळी फुलेनगर भागातील नागरिकांना डाळ तांदूळ तेल साखर इत्यादी आवश्यक सामग्री वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून याविषयी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून शासनाला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अभय भोर यांनी नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि शासनाचे देखील आभार व्यक्त केले.