शबनम न्युज | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला प्रतिसाद देत आज १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या एक तासाच्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ब’ प्रभागाच्या विशेष सहकार्याने प्रभाग क्रमांक १८ चिंचवडगावात ‘क्रां.चापेकर चौक ते दशक्रिया विधी घाट’ दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम राबविण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वच्छेतेची शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी या मोहीमेत माजी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, राजाभाऊ गोलांडे, गोविंदजी पानसरे, माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, भारत केसरी पै.विजय गावडे, धनंजय शाळिग्राम, अजित कुलथे, पराग जोशी, अनिल गावडे, चिंचवडमधील महिला बचत गट, हुतात्मा चापेकर मनपा शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, स्वच्छता कर्मचारी, मनपा अधिकारी व चिंचवडकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.