शबनम न्युज | प्रतिनिधी
पिंपरी : महात्मा गांधी जयंती निमित्त दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, गांधी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला याप्रसंगी अध्यक्ष दुर्गा भोर यांनी महिलांना स्वदेशी कपडे वापरण्याचे आवाहन केले आणि खादी ग्रामोद्योग द्वारे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असून महिलांनी त्याचा उपयोग करून घ्यावा आणि शक्यतो महिलांनी खादीचा वापर वाढवावा जेणेकरून आपल्या राज्यांमध्ये रोजगार निर्मितीस चालना मिळेल आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराला आपल्याला पुढे आणायचे असून शांततेचा संदेश घराघरांमध्ये पोहोचवावा असे सांगितले .
याप्रसंगी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या पुजा गरड, शैला उमापती ,माया वानखडे,विद्या पाटील,स्वाती मुरकर,सोनाली तायडे,अपर्णा धनविज,रुद्राक्ष तट,अंजली कोल्हे,अल्का निघते उपस्थित होते