शबनम न्युज | मुंबई
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी चाहते अत्यंत उत्सुक आहेत. या चित्रपटातून पहिल्यांदाच रणवीर आणि रश्मिका मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता, तर आता या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने ॲनिमल चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा पोस्टर तिच्या सोशल मीडिया द्वारे शेअर केला आहे. ‘हुआ में’ असं गाण्याचे नाव असून, हे गाणे हिंदी सह 5 भाषेत प्रदर्शित होणार आहे.
रश्मिकाने शेअर केलेल्या पोस्टरवर चाहत्यांनी अत्यंत मजेशीर प्रतिक्रिया देखील दिली आहेत. दरम्यान, ॲनिमल हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मात्र व्हीएफएक्स मुळे ॲनिमलचे प्रदर्शने पुढे ढकलण्यात आले आहे. वर्ल्ड क्लास प्रोडक्ट असल्यामुळे दिग्दर्शकाला या चित्रपटासाठी अजून वेळ हवा होता. त्यामुळे निर्मात्यांनी ॲनिमल डिसेंबर पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय देखील घेतला आहे, म्हणून 1 डिसेंबर 23 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे चर्चा सुरू आहेत.