शबनम न्यूज | प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड
मोशी : पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या मागणीची दखल घेत मोशी ते चिखली रस्ता डांबरीकरण काम पूर्ण झाले आहे. सदर रस्ता बऱ्याच दिवस पासून खराब झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक झाली होती, या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते , मोशी परिसरातील देहूरस्त्यावरील पाण्याचे पाईप लाईन व गॅस लाईनचे पाईप टाकण्याचे काम प्रशासन वतीने पूर्ण झाले हे काम पूर्ण होऊन बराच काळ उलटला तरीही त्या कामामुळे खराब झालेले रस्ते रस्त्यावर झालेले मोठे खड्डे हे दुरुस्त करण्यात आले नाही, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकींना अनेक अडथळे निर्माण झाले , रस्ते फोडल्यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला, संबंधित ठेकेदाराने आपले काम व्यवस्थित केले नाही त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले ,त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत होते व या परिसरातील नागरिकांना वाहतुकीला व रहदारीला मोठी अडचण निर्माण झाली हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा व या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी सदर रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी या परिसरातील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी मनपा प्रशासनाकडे केली , वारंवार या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वसंत बोराटे यांनी पाठपुरावा केला , त्यांच्या या मागणीची दखल घेत मनपा प्रशासन वतीने अखेर सदर रस्ता दुरुस्त करण्यात आला. सदर रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले असून आता वाहतूक सुरळीत झाली आहे.अनेक दिवसापासून नागरिकांना त्रासदायक ठरलेल्या देहू रस्त्यावरील खड्डे व खडी पासून अखेर नागरिकांची सुटका झाली, माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने प्रशासनाला अनेक दिवस पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात आला , अखेर भारत माता चौक ते लक्ष्मी चौक पर्यंतच्या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम अखेर प्रशासन वतीने पूर्ण करण्यात आले.