शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने दर आठवड्याला जनसंवाद सभा ही नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयात घेतली जाते. व प्रभाग वतीने आगामी आर्थिक वर्ष 2024-25 च्या अंदाजपत्रकासाठी नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या.
जनसंवाद सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने दरवर्षी याप्रमाणे नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत असतात, महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सूचना नागरिकांना करता येतात, शहरातील कुदळवाडी परिसरातील स्वीकृत सदस्य सदस्य दिनेश यादव यांनी कुदळवाडी येथील आरोग्य निरीक्षक कॅबिनसाठी आगामी आर्थिक अंदाजपत्रकात तरतूद करावी व आरोग्य निरीक्षक केबिन बसवावी, अशी मागणी केली आहे. सदर कामाला अंदाजे दहा लाख रुपये खर्च येणार असल्याने व प्रभाग कार्यालयाला याबाबत दिनेश यादव यांनी सूचित केले आहे. यावेळी दिनेश यादव यांनी व क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांना याबाबतचे निवेदन दिले.