शबनम न्युज | चिखली
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरगुडे वस्ती चिखली येथे दीड लाख रुपये किमतीचा स्क्रॅप माल घरफोडी करून चोरून नेण्यात आला होता, तसेच चिखली येथेच 3 लाख 50 हजार रुपये किमतीचा माल चोरीला गेला होता. या दोन्ही गुन्ह्याचे तपास करत असताना, दोन्ही गुन्ह्याचा आरोपी एक असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यानुसार सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला असता, दोन्ही गुन्हे सनी विनोद गौड (वय 32, रा. दत्त मंदिराजवळ, बालाजी नगर झोपडपट्टी भोसरी पुणे) याने व त्याचे इतर साथीदाराच्या मदतीने घरफोड्या केल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार सनी गौड याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासा दरम्यान दोन्ही गुन्हे एकाच आरोपीने केल्याचे दाट शक्यता असल्याने सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने दोन्ही गुन्ह्याचा आरोपी एक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी संजय राणावत याचे मोबाईल फोन नंबरचे सीडीआर प्राप्त करून त्याच्या तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी संजय राणावत हा उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन संजय राणावत (वय 32, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. चिखली पुणे) यास अटक केली.
दोन्ही गुन्हे दोघांनी मिळून केले असल्याची कबुली संजय राणावत व सनी गोड यांनी दिली. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 454, 457, 380, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पिंपरी, पुणे या ठिकाणाहून 22 हजार 483 रुपये किमतीचे तीन किलो कारबायड इन्सर्ट मटेरियल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींनी कबुली दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाची माहिती दिल्याप्रमाणे चोरी झालेले माल हस्तगत करण्यात आला.