गृह उपयोगी वस्तू मूळ किमतीच्या 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून वाटप
शबनम न्यूज , प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील राष्ट्रवादीचे युवा नेते शाम जगताप यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमराबविले जातात , या वेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर गृह उपयोगी वस्तूंचे ५० टक्के सवलतीच्या दारात उपलब्ध वाटप करण्यात आले. दसऱ्याच्या मुहूर्तावर दसऱ्याच्या दिवशीच नवीन वस्तू मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता या वस्तूंमध्ये या सर्व उपयोगी वस्तू नामांकित कंपनीच्या उपलब्ध करून देण्यात आल्या, सदर वस्तूची मूळ किमती पेक्षा 50 टक्के सवलतीच्या दारात उपलब्ध करून देण्यात आल्या.
या वस्तूंमध्ये स्मार्ट टीव्ही, वॉटर फिल्टर, पीठ गिरणी, सायकल, गॅस शेगडी अशा गृह उपयोगी वस्तूं कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच या सर्व वस्तू नामांकित कंपनीच्या व वॉरंटी गॅरंटी सह उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये याची उत्सुकता व आनंद पाहावयास मिळत होता .शाम जगताप यांच्या वतीने हा उपक्रम दिवाळी , दसरा सणाच्या आनंदात भर घालणारा उपक्रम ठरला.
सदर वस्तू वाटपाचा कार्यक्रम शाम जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालय पिंपळे गुरव येथे संपन्न झाला यावेळी राहुल चोथवे , हितेश जाधव , गणेश फुगे , निखिल जगताप, गणेश जगताप ,अतुल काशीद ,सौरभ जगताप ,गणेश शिंदे ,अतुल साखरे, हिमांशू जगताप, शुभम पिंपळे, अमित जगताप ,आदेश जगताप, दिग्विजय जगताप ,अक्षय जगताप ,भास्कर सदामते यांच्यासह शाम भाऊ जगताप यांचा मोठा मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता.