एकनाथ पवार यांनी मराठा समाजाच्य आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिला होता भाजप पक्षाचा राजीनामा
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे युवा नेते चेतन पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी दोन दिवसापूर्वीच भाजप पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदाचा तसेच प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ पवार यांनी सांगितले होते की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी मी भाजप पक्षाचा राजीनामा देत आहे तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास या दोघांमुळेच विलंब होत असल्याची टीका केली होती तसेच आपली राजकीय भूमिका आपण दोन दिवसात स्पष्ट करू असेही पत्रकारांना सांगितले होते काल दसरा मेळावा उत्साहात साजरा झाला त्यानंतर आज एकनाथ पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचेच युवा नेते चेतन पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.