शबनम न्यूज | अहमदनगर
अहमदनगर | प्रतिनिधी
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. या समारंभात डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना सन्मानित करण्यात आले.
Advertisement
त्यामुळे, त्यांच्या नावापुढे आता डॉक्टर ही पदवी लागली आहे. शरद पवार यांनी बहुमानासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आभार मानले आहेत. कृषी विकास आणि कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कृतज्ञतापूर्वक या सन्मानाचा स्वीकार करतो. तसेच, देशभरातल्या ज्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अलोट प्रेम केलं, त्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान समर्पित करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे .
Advertisement