शबनम न्यूज , प्रतिनिधी :
मावळ : मावळ मतदार संघाचे आमदार मावळ सुनील शेळके यांच्या उपस्थितीत दिवड गावातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, या वेळी आमदार सुनील शेळके यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले कि गावाच्या विकासाचे ध्येय असलेल्या दिवड गावातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.गावाच्या हितासाठी सर्वजण एकत्र आलात याबद्दल अभिनंदन.! सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात मनापासून स्वागत करतो.
राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये महेंद्र राजिवडे, देविदास सावळे, सचिन राजिवडे, संतोष राजिवडे, अनिल राजिवडे, अमर राजिवडे, हनुमंत राजिवडे, बाळू राजिवडे, रामदास बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी मा.सरपंच लहू सावळे, नामदेव सावळे, मा.उपसरपंच रोहिदास सावळे, शंकर कदम, दत्ताभाऊ सावळे, प्रकाश राजिवडे, दिपकभाऊ सावळे, भागुजी सावळे, अमोल सावळे तसेच दिवड गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.