शबनम न्यूज | मुंबई
अभिनेत्री सागरिका घाटगे हिने मराठीसह बॉलीवूडमध्ये ही काम केले आहे. चक दे इंडिया चित्रपटाच्या निमित्ताने सागरीकाला थेट शाहरुख खान सोबत काम करण्याची संधी मिळाली होती. 2017 मध्ये सागरीकाने भारताचे माजी वेगवान गोलंदाज झहीर खान बरोबर लग्न केले. लग्नानंतर काही काळ मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतल्यानंतर आता सागरीकाने तिच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे. इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत सागरीकाने तिच्या व्यवसाय संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे.
सागरीकाने नुकताच कपड्यांचा नवीन ब्रँड लाँच केला आहे. ‘अकुती’ असं तिच्या नवीन ब्रँडचं नाव आहे. मुंबईत पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात अभिनेत्रीने नवनवीन ड्रेस आणि साड्यांचे झलक तिच्या चाहत्यांबरोबर शहर केली. पारंपारिक साड्यांना आधुनिक वेस्टन टच देत तीने हा नवा कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात अभिनेत्रीला तिची आई उर्मिला यांची मोठी साथ लाभली आहे.
सागरिका लिहिते, “माझी आई माझा सगळ्यात मोठा पाठिंबा आहे. तिचा माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे. तिच्या साड्यांवर नेहमीच विविध रंगांच्या फुलांची चित्र आणि अनोखं नक्षीकाम केलेलं असायचं. यामधूनच मला प्रेरणा मिळाली. आमच्या या सुंदर साड्या आई आणि मी डिझाईन केल्या आहेत.” दरम्यान, कपड्यांच्या या नव्या व्यवसायासाठी सागरिकाला तिच्या मित्र-मैत्रिणींसह चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.