शबनम न्युज | मुंबई
आज शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अनेकांचे भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार का? असे अनेकांच्या मनात प्रश्न पडले आहे. त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे.
ते म्हणाले, मतदार संघातल्या विकास कामाच्या दृष्टीने अजित पवारांची भेट घेतली. शिरूर मतदार संघात दोन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. 2019 च्या निवडणुकीवेळी महत्त्वाचे मुद्दे होते. बैलगाडा शर्यत, पुणे नाशिक वाहतूक कोंडी यासारखे विषय होते. बैलगाडा शर्यत सुरू झाली, पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प कॅबिनेटच्या मंजुरीसाठी रखडली आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाला गती देण्यासाठी आजही भेट होती. त्याच सोबत इंद्रायणी मेडिसिटी सारख्या अत्यंत महत्त्वकांशी प्रकल्प आहे. ज्यात 26 सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एका कॅम्पस मध्ये येणार आहे. हा देखील प्रकल्प पुढे कसा नेता येईल यासाठीही भेट होती असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी कोणाकडे असावी, ही मागणी प्रत्येकाने करणे योग्य आहे. मी ज्या बाजूने आहे त्यांच्याकडे आला पाहिजे, हे वाटणे स्वाभाविक आहे. पण निर्णय घेणारे निवडणूक आयोग जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल, पुरावे असल्याने आम्ही योग्य बाजू मांडतोय. जो काही निर्णय येईल त्यानुसार पुढची पाऊल टाकली जातील असेही कोल्हे यांनी म्हंटले.