शबनम न्युज | पिंपरी
दि. 27 ते 28 नोव्हेंबर 2022 रोजी सैनिकी स्कूल प्रवरानगर ता. राहता जि.अहमदनगर येथे झालेल्या शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील विद्यार्थीनीं खेळाडूंनी 19 वर्षाखालील मुलींच्या गटात कु. श्रावणी मच्छिंद्र गव्हाणे(12वी सायन्स) याने 51 किलो ग्रॅम वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला व कु. वैष्णवी सचिन शिंगोटे बारावी कला हिने 48 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळविला तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कु. ज्ञानेश्वरी सुधाकर हाके(11वी कला) हिने 63 किलोग्रॅम वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे प्रथम क्रमांक प्राप्त दोन खेळाडूंची दिनांक 1ते 5 डिसें.2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व ऋषिकांत वचकल यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ.अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.