पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य हॉलिस्टिक कॅन्सर केअर सेंटर च्या वतीने आयोजन
शबनम न्युज | पिंपरी
मराठी पत्रकार परिषद ही देशातील सर्वात जुनी, सर्वात मोठी पत्रकार मातृसंस्था आहे. ३ डिसेंबर हा परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी आरोग्य दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. मागील वर्षी एकाच दिवशी महाराष्ट्रातील आठ हजार पत्रकारांची तपासणी करण्यात आली होती. यावर्षी तब्बल दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी केला होता. त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने आरोग्य शिबिराचे उत्कृष्ठ आयोजन केले आहे असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य हॅलोस्टिक कॅन्सर केअर सेंटरच्या वतीने सर्व पत्रकार बंधू भगिनी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन पाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घेतला. यावेळी पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजू वारभुवन, डॉ. देविदास शेलार, बापूसाहेब गोरे, प्रकाश जमाले आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी संगीता तरडे, साम टीव्हीचे गोपाळ मोटघरे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड, मुकेश गायकवाड, लोकमान्य कॅन्सर रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. निनाद नाईक, डॉ. क्षिरसागर, डॉ. सहदेव गोळे तसेच नंदादीप सेरी आय हॉस्पिटल यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, डोळे तपासणी व विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार यावेळी करण्यात आले.
आयोजनात महावीर जाधव, संतोष गोतावळे, नितीन कालेकर, अशोक कोकणे, सिद्धांत चौधरी, जेम्स साळवे, सोमनाथ नाडे, प्रसाद वडघुले, सागर बाबर, विनय सोनवणे, दत्तात्रय कांबळे, हनुमंत रामदासी, हर्षद कुलकर्णी, पराग डिंगणकर, प्रकाश अनंतकर, रमेश साठे, आदी पत्रकारांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. डॉ. सहदेव गोळे यांनी सर्व उपस्थितीतांचे स्वागत केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल वडघुले आभार कार्याध्यक्ष अविनाश आदक यांनी आभार मानले.