शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ फेब्रुवारी) ;- भोसरीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सूर्यनमस्कराच्या माध्यमातून राष्ट्रवंदना हा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर व पतंजली योग समिती पिं.चिं.(भोसरी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने सूर्य नमस्कार से राष्ट्रवंदना हा कार्यक्रम रविवार दि.६/०२/२०२२ रोजी स्वर्गीय भिमाबाई मडगिरी उद्यान सेक्टर नंबर-१ इंद्रायणी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
प्रथम,नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर योग शिक्षक दिलीप जाधव, कांतीलाल कर्पे व चंद्रकांत गावडे यांनी सूर्यनमस्कार, प्रार्थना व शांती पाठ घेतला.
यावेळी आयोजक श्री.जयदिप कर्पे यांनी सर्वांना तुळशीचे रोप भेट देऊन सन्मान केला व आभार मानले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र लांडगे,भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जयदिप कर्पे,मंगेश आहेर, प्रशांत आहेर,शरद वाघ, संजय ओव्हाळ,यश कर्पे,संजय रहाणे, राजेश चौधरी,प्रसाद देशमुख,प्रशांत देशपांडे, कृष्णाजी तावरे,शंकर मेमाने,बालाजी ढगे, पंढरीनाथ घोडके,बबनराव वाडेकर,आदिती कर्पे,शौर्य कर्पे,उज्वला महाजन, निर्मला उगले,ढगे आदी उपस्थित होते.