शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
मुस्लिम समाजाला आरक्षण आणि संरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख राजकीय व सामाजिक संघटनेच्यावतीने प्रतिनिधींची बैठक लतिफिया जामा मस्जिद हाॅल मिलिंद नगर पिंपरी येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुढिल कामकाजासाठी शहर स्तरावर मुस्लिम आरक्षण कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी डंबाळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी चे प्रवक्ता जुबेर भाई मेमन, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष हाजी युसुफ कुरेशी, रिपाइं (आठवले गट)चे वाहतूक आघाडी चे प्रदेश अध्यक्ष अजिज भाई शेख ,पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख,शिव सेना ( उद्धव ठाकरे गटाचे) उप शहर प्रमुख हाजी दस्तगीर मनियार, पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी चे उपाध्यक्ष हाजी गुलाम रसूल सय्यद, ( एम.आय.एम) शहर उपाध्यक्ष, नियाज भाई देसाई, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे शहराध्यक्ष जैद भाई शेख, सरचिटणीस शौएब मुजावर , सहकार फाउंडेशन चे स. अध्यक्ष अब्दुल लतिफ सय्यद, लोकशाही युवा फाउंडेशन (महा.राज्य) चे असद पटेल, युनूस भाई शेख , मुदस्सीर मुजावर, युनूस भाई पगढीवाले, सामाजिक कार्यकर्ते शाहाजी अत्तार, नासिर भाई शेख, , हाजी फकीर भाई मुलांनी, अब्दुल रज्जाक मणियार इमरान भाई बिजापूर, बाबुलाल शेख, रफिक भाई शेख, उपस्थित होते.
पुढील बैठक येत्या दोन दिवसात घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.