शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स’ ही संस्था गेली ४० वर्षापासून विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाचे सर्वोत्तम कार्य करीत आहे. १९७६ साली या संस्थेची स्थापना झाली. महाराष्ट्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारी संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आहे.
या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ‘फेलो महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नावाने पुरस्कार दिला जातो. यावर्षी’ यांमध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नौरोसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांना ‘फेलो महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस २०२३’ चा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला.
गेली अनेक वर्षापासून प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विज्ञान व तंत्रज्ञानाला अनुसरून संशोधन कार्य केलेले आहे. त्यांचे चार पेटंट तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर ६० च्यावर नामांकित जर्नलमध्ये संशोधन पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्याकडून ‘फेलो महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस २०२३’ चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात भौतिकशास्राचे प्रा. डॉ. संभाजी वारूळे यांना देखील ‘यंग फेलो’ म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार व डॉ. संभाजी वारूळे यांना संशोधनाच्या संपूर्ण वाटचालीमध्ये मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, विश्वस्त डॉ. अशोक चांडक, सीएफओ श्री गणेशन आणि वाडिया कुटुंबीय यांचे मोलाचे योगदान लाभले.
सदर कार्यक्रम संत ज्ञानेश्वर हॉल एम. आय. टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमांमध्ये डॉ. विश्वनाथ कराड ह्यांनाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. गौतम बापट, डॉ. भरत काळे आदी सहभागी झाले होते.