शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे येथील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द झाला पुनावळे करांच्या मागणीला यश आल्याने तसेच भाजप आमदार अश्विनी जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधी मुळे सदर चा प्रकल्प रद्द करण्यात आला या बाबत चा आनंद पुनावळे ग्रामस्थांनी , भारतीय जनता पक्षच शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यानां पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला.
सदर कचरा प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुनावळेकर रहिवाशींच्या वतीने अनेक वर्ष पासून करण्यात येत होती या करिता अनेक सामाजिक संघटना , राजकीय पक्ष यांनी प्रयत्न केले .प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा कायमचा रद्द करावा अशा मागणीची निवेदन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्याकडे भाजप चे युवा नेते नवनाथ ढवळे यांच्या सह पुनावळेकरांनी दिले होते, सदर चा प्रश्न आमदार अश्विनी जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात मांडावा अशी हि विनंती करण्यात आली होती, पुनावळे करांच्या या मागणीला अखेर यश आले असून सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी पुनावळेतील कचराडेपो बाबत लक्षवेधी मांडली.
संबंधित जागेवर कचरा डेपो झाल्यास लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तसेच स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न व शालेय विद्यार्थी आरोग्य प्रश्न युवकांचे नोकरीचा प्रश्न जेष्ठ नागरिकांना शुद्ध हवा मिळण्याचा प्रश्न वृक्षतोड झाल्याने पर्यावरण दूषित होण्याचा प्रश्न आणि वाहतुकीचे प्रश्न असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ शकतात या विविध समस्या लक्षात घेता पुनावळे ग्रामस्थ व परिसरातील हाऊसिंग सोसायटी मधील रहिवासी यांचे कुटुंबीय व लहान मुले मुली आजी आजोबा या सर्वांना या समस्यांना सामोरे जावे लागत नाही परिणामी नागरिक पुनावळे सोडून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. या सर्व बाबींची दक्षता घेत सदर प्रस्तावित कचरा डेपो रद्द करण्यात आला असून हिवाळी अधिवेशनातच पुनावळेत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था असून शाळा, महाविद्यालये झाली आहेत. लोकांचा प्रस्तावित कचरा डेपो ला प्रचंड विरोध आहे. वाढलेली लोकवस्ती विचारात घेता पुनावळेत कचरा डेपो केला जाणार नसल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
पुनावळे करांच्या मागणीला यश आल्याने तसेच भाजप आमदार अश्विनी जगताप यांनी मांडलेल्या लक्षवेधी मुळे सदर चा प्रकल्प रद्द करण्यात आला या बाबत चा आनंद पुनावळे ग्रामस्थांनी , भारतीय जनता पक्ष चे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यानां पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला .