शबनम न्युज | पिंपरी
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या 465 संजीवन समाधी महोत्सवानिमित्त गणेश भक्तांच्या सहकार्याने तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आश्विनी गजानन चिंचवडे- पाटील यांच्या संयोजनातून श्रीं चा सामुदायिक महा अभिषेक आयोजित करण्यात आला आहे. हा महा अभिषेक शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2012 23 रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
तसेच या प्रसंगी रक्तदान शिबिराची तसेच नेत्र व दंतचिकित आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे संयोजक राजू शिवतरे करणार आहेत. तर नेत्र व दंतचिकित्सा आरोग्य तपासणी शिबिरात डॉ.शरद चव्हाण, डॉ. रवींद्र चव्हाण, डॉ. गौरी पाटील, डॉ. प्रकाश पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे.
तसेच सदर कार्यक्रमांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आश्विनी गजानन चिंचवडे-पाटील यांनी केले आहे.