शबनम न्यूज : प्रतिनिधी ,
शिव वाहतुक सेना महाराष्ट्र अध्यक्ष कामगार नेते महेश पोरे व गडचिरोली शिवसेना जिल्हा प्रमुख महेश केदारी यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख गणेश खरात यांनी शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिव वाहतुक सेना महाराष्ट्र अध्यक्ष कामगार नेते महेश पोरे यांनी गणेश खरात यांची शिवसेनेच्या शिव वाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली या वेळी अनेक शिवसैनिक आणि मित्र परिवार उपस्थित होते. या निवडी नंतर गणेश खरात यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Advertisement
Advertisement