शबनम न्यूज : प्रतिनिधी ,
पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील परांजपे अजुरे सोसायटी मधील सुमारे 50 ते 55 ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन अजूरे यंगस्टर ग्रुपची स्थापना केली आहे या जेष्ठ नागरिकांनी तरुणांनीही वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे गेल्या वर्षभरात विविध समाजकार्य उपक्रम राबविले आहेत.
यातच नवीन वर्षाची सुरुवात करण्याच्या उद्देशाने या ग्रुपने वर्षाच्या सुरुवातीलाच सोसायटी परिसर स्वच्छता अभियान राबविले अतिशय आगळ्यावेगळ्या अशा या नववर्ष संकल्पनेत इतर नागरिकांनीही सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला.
या यंगस्टर ग्रुपच्या उपक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेस चे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष तुषार ताम्हणे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे प्रतिपादन ग्रुपचे सदस्य श्रीकांत कोयते यांनी यावेळी सांगितले , वय वर्ष 62 ते 85 या वयोगटातील सुमारे 25 ते 30 सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला .
85 वयाचे असलेले माजी सैनिक शरद बेडेकर यांचा सक्रिय सहभाग हे या उपक्रमाचे खास आकर्षण ठरले.
सोसायटी मधील रहिवाशांना तसेच सर्व व्यावसायिकांना गाळाधारकांना यावेळी स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले.