शबनम न्यूज , प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शबनम न्यूज च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. पत्रकार दिनाचे औचित्य साधत सदर प्रकाशन सोहळा मोशी येथील क्लासिओ हॉटेल, आळंदी – मोशी रोड येथे संपन्न झाला.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मागील आठ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या शबनम न्यूज मीडिया ग्रुप या वृत्तसंस्थेच्या वतीने सन 2024 दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली, सदर प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन या पत्रकार दिनाचे औचित्य साधत शबनम न्यूज वृत्तसंस्थेच्या संपादिका शबनम सय्यद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्याची विनंती केली त्यांच्या या विनंतीला मान देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. व वृत्तसंस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रकाशन सोहळा प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक संजय नेवाळे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, युवा नेते अतिश बारणे, प्रदीप आहेर, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, शितल हगवणे. आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांचे शबनम सय्यद यांनी आभार व्यक्त केले.