शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुख्य समन्वयक पदी थेरगाव परिसरातील राष्ट्रवादीचे युवा नेते प्रशांत सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रशांत सपकाळ यांना देण्यात आले. प्रशांत सपकाळ यांची ही नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी केली आहे.
याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर,पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माझी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात प्रशांत सपकाळ यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मागील कोरोना सारख्या संकटमयकाळात त्यांनी थेरगाव परिसरातील अनेक सामान्य कुटुंबांना मदत केली आहे .अन्नधान्य वाटप ,सॅनिटायझर ,मास्क वाटप या सामाजिक कार्यामुळे थेरगाव परिसरात त्यांचे नावलौकिक झाले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करताना त्यांनी युवकांचे केलेले मजबूत संघटन ,राष्ट्रवादी पक्षाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत ,त्यांचे प्रामाणिकपणे पक्षाचे काम व युवकांवर असलेली पकड तसेच संघटन मजबूत करण्यावर त्यांनी दिलेला भर या सर्व गोष्टींचा विचार करूनच त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुख्य समन्वयक पदावर संधी मिळाली आहे.