शबनम न्यूज , प्रतिनिधी :
तत्कालीन पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील सन 1972-84च्या भूसंपादन बाधित भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी ६.२५% जमीन परताव्याबाबत शिवसेने चे युवा नेते सुरज बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. सुरज बाबर यांनी या बाबत निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केलेआहे कि पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील सन 1972-84च्या भूसंपादन बाधित भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी 12.5% ऐवजी 6.5% जमीन परताव्याबाबत त्यावर 2 एफएसआय वाटप व त्यावर 0.15 एफएसआय वाणिज्य वापराच्या बाबत पाठपुरावा करीत आहोत याबाबत आम्ही ४ जानेवारी 2024 रोजी नगर विकास विभागाला विचारणे केली असता पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील सन 1972-84च्या भूसंपादन बाधित भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी ६.२५% जमीन परताव्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून नस्ती क्र : पीआरडी-३३२२/ प्र.क्र २१४/ नवि-०७ वित्त विभागाच्या अभिप्रायास्तव सादर केलेली आहे असे सांगण्यात आले.
निगडी ,आकुर्डी ,काळभोरनगर चिंचवड,वाल्हेकरवाडी ,मोशी, भोसरी, चिखली तत्कालीन पिंपरी चिंचवड प्राधिकरण बाधित भूमिपुत्र शेतकर्यांच्या उपजीविकेच्या जमिनी कवडीमोल किमतीत ताब्यात घेतल्यामुळे मागील तीस चाळीस वर्षांमध्ये शेतकरी भूमिहीन शेतीववसाय हिरावल्याने काही बेरोजगार, पुढील तीन-चार पिढीनुसार कुटुंबे वाढल्याने आज काही भूमिपुत्र शेतकरी भाडेचे घरात, काही शेतकरी गाव सोडून बाहेर गावी राहण्यास गेले आहेत अशी दयनीय अवस्थामध्ये भूमिपुत्र शेतकरी गुजराण करीत आहे.
उपरोक्त विषयावर तसेच आम्ही नमूद केलेला आशय तत्कालीन पिंपरी-चिंचवड प्राधिकरणातील सन 1972-84च्या भूसंपादन बाधित भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी ६.२५% जमीन परतावा देऊन भूमिपुत्रांना न्याय द्यावा
माननीय मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आपण भूमिपुत्रांचे हित पाहता उपरोक्त विषयास व त्यासंबंधित प्रस्तावास तात्काळ मान्यता द्यावी असे सुरज बाबर यांनी निवेदनात नमूद केलेलं आहे.