शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी : विद्यानगर परशुरामनगर झोपडपट्टी बचाव कृती समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बाबुराव कळसे यांची मतदान प्रक्रियेद्वारे मतदान घेऊन निवड करण्यात आली शहरातील प्रभाग क्र.१० विद्यानगर परशुराम नगर सर्व राजकीय पक्षात, सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्थानिक नागरिकांनी मतदान करून विठ्ठल कळसे यांना बहुमताने निवडूनह दिले.
सर्वांनी मताच्या माध्यमातून टाकलेली अध्यक्ष पदाच्या जबाबदारीला मी कोणत्याही प्रकारे राजकारण न करता विश्वासघात किंवा तडा जाऊ देणार नाही समितीमधील पदाधिकारी सभासद महिला पुरुष सर्वांना विश्वासात घेऊनच आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून समाज हितासाठी पुढील देशा ठरवण्यात येईल कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही कोणत्याही परिस्थितीत समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकारण न करता स्थानिक सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे हक्काच स्वतःच घरे वाचवण्यासाठी मी समितीमधील सर्वांना सोबत घेऊन सातत्याने प्रयत्न करणार आहे वरील ठिकाणी कोणत्याही अनोळखी बोगस व्यक्ताती कडून भुल थापाला बळी न पडता माझ्याशी संपर्क साधावा यासाठी तुमच्या सोबत मि व माझी समिती सदैव एस आर रे प्रकल्प सर्वे न करण्यासाठी व आहे त्या ठिकाणीच घरे असले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणार आहोत असे विठ्ठल कळसे यांनी सांगितले.
विध्यानगर प्रभाग क्र.१० मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा कोणताही आदेश नसताना स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी एस आर ए सारख्या प्रायव्हेट बिल्डरच्या घशात गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांचे घरे घालण्यासाठी बेत केला जात असल्याचे काही सर्वसामान्य नागरिकांकडून माहिती उपलब्ध झाल्याने झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात नागरिकांची महत्वाची बैठक आयोजित केली.सर्व सामाजिक राजकीय पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.१० चिंचवड विद्यानगर हनुमान मंदिर जवळ मनपा समाज हॉल या ठिकाणी पुढील दिशा व नागरिकांना जन जागृत करण्यासाठी गुरुवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता बैठक आयोजित केली होती विद्यानगर परशुराम नगर मधील सामाजिक, राजकीय ,कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे व युवा वर्ग सर्वसामान्य महिला पुरुष यांना विश्वासात घेऊन भविष्यात विध्यानगर परशुराम नगर मधील स्थानिक सर्वसामान्य नागरिकांवर अन्य होऊ नये म्हणून कार्यकारणी पुढील प्रमाणे समिती स्थापन करण्यात आली. अध्यक्ष:- विठ्ठल भाऊ बाबुराव कळसे (उपाध्यक्ष) संभाजी नाईकनवरे, सचिन सकाटे, धर्मेंद्र गावडे (कार्याध्यक्ष) दयानंद मोरे, सय्यद पटेल, संजय शिंदे (खजिनदार) विजय चव्हाण, मंगेश चौधरी ( सह खजिनदार) अमर थिटे, नितीन दौंडकर, सचिन विटकर (सेक्रेटरी)आतिश पात्रे, गंगाधर काळे, किशोर गुंजाळ (उपसेक्रेटरी)करामत खान, प्रीतम तेलंग (प्रसिद्धी प्रमुख) आसिफ खान ,ओमकार तुपे, गणेश फुलखिले ( हिशोब तपासणीस) निलेश भिगवणकर, मारुती पवळे, अरुण पात्रे (सल्लागार) मा. नगरसेवक राम पात्रे, सुमन दौंडकर,राम उत्तेकर,सरस्वती गोफणे, अनुसया दणाणे,गजराबाई मोरे,सुनिता अलकोट, नारायण गायकवाड, सुभाष कांबळे,भारत कोकरे,फिरोज चौधरी,अंबुबाई जमादार (सदस्य) रमेश कसबे,नंदू गायकवाड, मयुर पात्रे,आदित्य तर्न, रोहित माने, अश्फाक शेख, आकाश जावळे, अभिषेक आवळे रणजीत शेंडगे आदी असणार आहे.