शबनम न्युज | मावळ
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे पाटील यांची मावळ लोकसभा संघटक पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना शाखा मोहननगर येथे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेविका सौ. मीनलताई विशाल यादव यांच्या संकल्पनेतून देशातील विविध खेळातील सर्वोच्च खेळाडूं माहितीपटाचा , ” गौरव देशाचा क्रीडा विश्वाचा, ” या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख सचिनजी भोसले, शिवसेना शहर संघटक श्री विशाल यादव, विभाग प्रमुख शशिकांत पाडाळे नागेशजी नामदे, सोमनाथजी अलंकार,मधुसूदन आंबुसकर, ज्येष्ठ शिवसैनिक मोहनजी धापटे,काशिद काका, रघुनाथ कदम, माझी पीएसआय काळे साहेब,मिलिंद दवणे, संजयजी पारसकर, युवा सेनेचे अनुज महाजन,प्रथमेश पाटील,कुशल बहिरवाडे, स्वप्निल येवले, स्वप्निल वाघिरे सर्व शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.