*प्रोजेक्ट आणि पोस्टर प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद*
शबनम न्युज : पुणे
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट आणि पोस्टर प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ संजय गुप्ता, योगेश शेठ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ विवेक सावजी, प्राचार्य डॉ विदुला सोवनी, डॉ.के.डी.जाधव, डॉ.सुनीता जाधव, डॉ.सचिन चव्हाण, डॉ.प्रदीप जाधव, डॉ.मिलिंद गायकवाड, डॉ.मयुरी मोळावडे आदि उपस्थित होते.आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन,बायोसायन्स, इंटरनेट ऑन थिंग्ज, अॅडव्हान्ड कंन्स्ट्रक्शन मटेरियल, रिन्युएबल एनर्जी, फायबर ऑप्टीक्स् अशा अनेक विषयातील संकल्पना या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांचे १२० संघ सहभागी झाले.डॉ. संजय गुप्ता यांनी स्टार्ट अपसाठी असणाऱ्या भांडवल उभारणीच्या योजनांची माहिती दिली. योगेश शेठ यांनी ग्रीनफिल्ड क्षेत्रातील प्रकल्प उभारणीची माहिती दिली. प्राचार्य डॉ. विदुला सोहोनी यांनी प्रदर्शनामागची भूमिका स्पष्ट केली. भारती विद्यापीठ चे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांची जयंती, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.