शबनम न्युज | पिंपरी
दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यामध्ये एम्पायर इस्टेट ह्या ठिकाणी सकाळी ८ ते १० या दरम्यान होम भवन कार्यक्रम पार पडला. व सर्वांना नाष्टा व चहा देण्यात आला. तसेच सकाळी ११ ते १ अयोध्यातून प्रभू श्री राम यांचे मोठ्या पडद्यावर लाईव्ह प्रसारण करण्यात आले. आणि त्यानंतर दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद ठेवण्यात आला होता.
एम्पायर इस्टेट येथे संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान प्रभू श्री रामचंद्र यांची भव्य दिव्य अशी शोभयात्रा काढण्यात आली. व एम्पायर इस्टेट येथील झेंडा चौकात संध्याकाळी ७ ते ८ या दरम्यान दीपोत्सव व महाआरती करण्यात आली. या प्रसंगी आयोजक – श्री. बाबुलाल चौधरी व त्यांचा सहपरिवार, एम्पायर इस्टेट मित्र मंडळ, एम्पायर इस्टेट जेष्ठ नागरिक संघ, एम्पायर इस्टेट फेडरेशन १,२ आणि ३, एम्पायर इस्टेट व्यापारी संघटना, एम्पायर इस्टेट महिला मंडळ, मांजराई देवी सेवा प्रतिष्ठान, स्वयंसिध्द संस्था व एम्पायर इस्टेट मधील नागरिक उपस्थित होते. व आमदार उमाताई खापरे ( विधानपरिषद ), आमदार अण्णा बनसोडे ( पिंपरी विधानसभा ) हे देखील उपस्थित होते. व यांचे नगरसेवक श्री. शैलेश प्रकाश मोरे व मित्र परिवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.