शबनम न्युज | पुणे
स्विफ्ट एक्स पिक्चर्स ची ‘कोणी घर देता का घर ‘ ही नवी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ! या वेबसिरीजचा शुभारंभ आणि पोस्टर लाँच कार्यक्रम भरत नाटय मंदिर येथे शनिवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पार पडला.
आर्यन ग्रुपचे संचालक आणि बीएस्सी ऍग्री नवरदेव या चित्रपटाचे निर्माते मिलिंद लडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी चित्रपट कलाकार गंधार जोशी आणि ‘मराठी कीडा’ सुरज खटावकर हे उपस्थित होते.
श्रीपाद दीक्षित, प्रणव भुरे हे निर्माते असून विद्यासागर कलावंत आणि समवेद कर्णिक हे सहनिर्माते आहेत.ही वेब सिरीज आदित्य बीडकर यांनी दिग्दर्शित केली आहे. यलो स्टुडिओ हे साऊंड पार्टनर असून मराठी टी शर्टस् हे क्लोदिंग पार्टनर आहेत. स्विफ्ट अॅक्स ग्रुपच्या यू ट्यूब चॅनेलवर ही वेब सिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे.
यावेळी मिलिंद लडगे म्हणाले ‘मराठी प्रेक्षक आणि मराठी जगली पाहिजे. मराठीची आस आणि कास आपण रसिक प्रेक्षकानीं धरली पाहिजे. तरच मराठी टिकेल.या सर्व टीमचे मी कौतुक करतो.
कलाकार गंधार जोशी आणि सुरज खटावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
निर्माते प्रणव भुरे यांनी वेब सिरीज विषयी माहिती दिली. आणि सर्व कलाकारांचा परिचय करून दिला. या वेब सिरीजचे दिग्दर्शक आदित्य बिडकर म्हणाले , ‘वेब सिरीजचे दिग्दर्शन करताना खुप चांगला अनुभव आला. खूप शिकायला मिळाले. मराठी प्रेक्षक आपण खेचून आणू हा आमच्या सर्व टीम ला आत्मविश्वास आहे’. वेब सिरीज १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.