शबनम न्यूज, प्रतिनिधी : तळेगाव दाभाडे
शुक्रवार, दिनांक – ०९/०२/२०२४ रोजी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पद व इतर पदांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी हॉटेल बगीचा, महालक्ष्मी आर. एम .सी चे प्रोप्रायटर, घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश राक्षे, उपाध्यक्षपदी विकास कंद, समीर भेगडे, सचिवपदी अतुल राऊत, खजिनदारपदी अमित भसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडींबाबत आपल्या भावना व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक/ सहकारभूषण श्री .बबनराव भेगडे (माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व संचालकांनी संस्थेच्या कामकाजात जास्तीत जास्त वेळ देऊन संस्था वाढीसाठी प्रयत्न करावेत. चांगली कर्जे देण्यात यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
पीएमआरडीए सदस्य व संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली व संस्थेचे प्रगतीचा आलेख त्यांनी सांगितिला. संस्थेची संस्थेच्यासभासद संख्या – ४१२५, एकूण आर्थिक उलाढाल – १३५ कोटी , ठेवी – ३३ कोटी ५० लाख , कर्ज वाटप – २७ कोटी , निधी – ३ कोटी २५ लाख
गुंतवणूक – १४ कोटी ५० लाख आहे. संस्थेच्या ३ नवीन शाखा सोमाटणे फाटा , देहूगाव व कामशेत या ठिकाणी लवकरच कार्यरत होत आहे. तसेच संस्था डिजिटलायझेशनच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकत असून या मार्फत चांगल्या ग्राहकाभिमुख सेवा संस्था यापुढेही देणार आहे.
नवनिर्वाचित सर्व आजी -माजी पदाधिकाऱ्यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देत असताना नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश राक्षे यांनी आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली त्यामध्ये निश्चितच मी पतसंस्थेला प्रगती पथावर नेत पतसंस्थेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य लोकांना बचतीची सवय लावून कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे यावेळी ते म्हटले. या निवडीच्या अनुषंगाने सर्व संचालकांचे आभार मानले. दरम्यान, संस्थेला प्रगतीपथावर नेण्याची हमी दिली.
यावेळी संस्थेचे संस्थापक सहकारभूषण बबनराव भेगडे, पीएमआरडीए सदस्य व संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे,माजी अध्यक्ष राहुल पारगे,शरद भोंगाडे, संचालक, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष अंकुश आंबेकर व सर्व संचालक, सल्लागार, आणि संस्थेचे सभासद, दैनंदिन बचत प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सचिव अतुल राऊत व आभार संचालक प्रवीण मुऱ्हे यांनी मानले.