शबनम न्यूज प्रतिनिधी,
पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे व राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 12 व 13 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात दरम्यान महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर त्याचबरोबर नेत्र तपासणी शिबिर व होमिओपॅथिक शिबीर याचा बरोबर महिलांच्या रोजगार निर्मिती साठी प्रात्साहं मिळावे या करिता महिला बचत गटाचे वस्तू विक्री चे भव्य स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबिर व महिलांसाठी विक्री स्टॉलचे प्रदर्शन शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख सरिता अरुण साने व महिला जिल्हाप्रमुख शैला पाचपुते (पिंपरी चिंचवड मावळ ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
सदर आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन सरिता साने यांनी केले असून महिला बचत गटांना व महिलांना त्यांच्या बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात विक्री स्टॉलचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात येणार आहे त्या विक्री स्टॉलचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, जेणेकरून महिलांना रोजगार निर्मितीसाठी, महिला सक्षम होण्यासाठी, महिलांना प्रोत्साहन मिळविण्यासाठी हे प्रदर्शन यशस्वी करण्याचे आवाहन सरिता साने यांनी केले आहे.