शबनम न्युज :प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : महापालिकेची अग्निशमन यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका विविध उपक्रम राबवित असते. याच अनुषंगाने महापालिकेने नव्याने १५ अग्निशमन वाहने ताफ्यात दाखल केली जाणार आहेत.
त्यातील ४ वाहने आज दाखल झाली असून या वाहनांचे लोकार्पण आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीत करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, अग्निशमन विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर, यांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कार्यकारी अभियंता कैलास दिवेकर, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे आदी उपस्थित होते.