शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वादळ फिरणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आता कडून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषणा कोणी बाकी असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत दोन सभा घेतल्या आणि आज शुक्रवार दिनांक 24 इंदापूर येथे अजित पवार यांची सभा सुरू आहे.
येत्या पाठोपाठ दोन मार्च रोजी बारामतीत विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने बारामती लोकसभेचे रणशिंग फुकणार असल्याचे संकेत दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाने रायगडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी या चिन्हांचे अनावरण खुद शरद पवार यांनी केले. तसेच ही तुतारी निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला दिले असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी शरद पवार यांनी दिली.