शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित युवा संवाद दिनांक 26/02/2024 रोजी घेण्यात आला होता. या युवा संवाद मध्ये युवा विकास युवा नेतृत्व, समस्या युवा युवतींच्या विद्यार्थिनींनची सुरक्षा प्रश्न युवा नोकरी शिक्षण स्टार्टअप व्यवसाय उद्योग या विषयांवर युवा व युवतींनी आपले विचार व्यक्त केले. पुढील काळामध्ये युवा युवतींनी राजकारणामध्ये यावे तसेच मुलींनी स्वसंरक्षणार्थ सक्षम व्हावे युवा आणि व त्यांना पुढील काळामध्ये अनेक संधी निर्माण होणार आहेत काही झालेल्या आहेत आणि या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आधुनिकरणाला सुद्धा सामोरे जावे लागले पाहिजे आणि त्याकरता लागलेल्या सर्व मदत ही संघटनेतर्फे तरुणांत तरुणींना करण्यात येणार असून विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. तसेच वेळोवेळी तरुणानंतरुणींनी संवाद साधून आपल्या मनातील विचार व्यक्त करणे हे गरजेचे असून कारण तरुणांचे विचार समोर आले तर आपल्याला सशक्त भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल तरच आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये येईल, असे आव्हान दुर्गा भोर अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड यांनी केले.
या तसेच इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी युवकांना स्टार्टअप उद्योग याविषयी मार्गदर्शन केले तसेच अनेक युवा त्यांना इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे शिक्षण घेता घेता स्वतःचे छोटे व्यवसाय करून शिक्षणाचा खर्च देखील सांभाळता येऊ शकतो आणि त्यासाठी कायम सहकार्याची भूमिका असेल असे सांगितले यावेळी युवकांनी स्टार्टअप उद्योगांमध्ये शासनाच्या योजना बँका देत नाहीत युवतींना कौशल्य विकास माध्यमातून नवीन तंत्रज्ञान माहिती देण्यात यावी साध्या ती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आणि युवा आणि युवती आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच पर जिल्ह्यातून राज्यातून आलेल्या विद्यार्थिनींना राहण्यासाठी शासकीय वसतीगृह मोठ्या प्रमाणात निर्माण करावीत जेणेकरून त्यांचे त्रास आणि सुरक्षा ही जपली जाईल अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी पुढील काळामध्ये युवा युवतींचे विविध प्रकारच्या युवा संवाद आयोजित करून त्यांना पूर्ण सहकार्याची भूमिका दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तसेच डॉ सुनिता चौधरी डॉ श्याम सोनवणे डॉ यशवंत महाजन श्री रोशन मराठे यांनी युवा युवतींना त्यांचे अनुभव सांगून मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने युवा व युवती युवा संवादाला उपस्थित होते.