पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला व पुरुष शरीर सौष्ठव अजित दादा श्री स्पर्धेचे आयोजन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस शोभाताई पगारे व फिरंगाई देवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ पगारे यांच्या संयुक्त विद्यमाने दापोडी परिसरात आयोजित करण्यात आले.
या स्पर्धेत अनेक युवक युवतींनी सहभाग घेतला या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, पिंपरी चिंचवड चे पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट, व पक्षाचे युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रम हा रविवारी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे , माजी नगरसेवक संजय नाना काटे, सामाजिक कार्यकर्ते सिकंदर सूर्यवंशी, दीपक साळवे, अरविंद शेठ, रविभाऊ कांबळे, नितीन शिंदे, अजय झुंबरे ,सनी खंडागळे ,डेविड बळीच ,मनोज शिंदे ,गिरीश बनसोडे, प्रकाश गायकवाड, अमित जाधव, मोईन मुजावर , अमित घाड,गे तेजस पाटोळे, निलेश भाडळे ,सनी धर्मशाळे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाच्या कविता खराडे, अस्मिता कांबळे, सुनीता अडसूळ, जसबीर चावला, अनिता बेळगावकर, संध्या खैरनार, मीनाताई गायकवाड, रेखा गायकवाड ,फमिदा शेख, सायली जंबूरे, मैथिली पगारे यांच्या सह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.