शबनम न्यूज,प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड ; जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आटो क्लस्टर ऑडिटोरियम चिंचवड सायन्स पार्क मुंबई पुणे रोड समोर संबंधित कार्यक्रम होणार असून संध्याकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी दुर्गाशक्ती सन्मान सोहळा करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील महिलांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे
यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील प्रसिद्ध उद्योजिका सुप्रियाजी बडवे मॅडम उद्योजिका सत्वशीला शिरोळे महानगरपालिका उपायुक्त श्री अजय चाथणकर साहेब अभिनेते विनायक जी भावे जिल्हा उद्योग केंद्राच्या शैला वानखेडे मॅडम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या ठिकाणी महिलांना उद्योग मार्गदर्शन सुद्धा होणार असून शासनाच्या विविध योजनांची सुद्धा माहिती मिळेल विजेत्या महिलांना पैठणी देण्यात येणार आहे तसेच उद्योगांना पुरवठा करण्यासाठी काही महिला बचत गटांना फिनेल कागदी पिशव्या एनवलप अशा विविध प्रकारच्या कामाचे वाटप होणार आहे