शबनम न्युज : प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. १० मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात हे शिबीर होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख डॉ. शशिकला राय ( गांधीजीं सोबत मैत्री),डॉ. कुमार सप्तर्षी( सत्याग्रहशास्त्र ), मुंबईचे पत्रकार सोहित मिश्रा ( महात्मा गांधी आणि आजचे वर्तमान) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे अकरावे शिबीर आहे.
अधिक माहितीसाठी सुदर्शन चखाले (प्रकल्प प्रभारी) – ७८८७६३०६१५,संदीप बर्वे (विश्वस्त सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ) – ९८६०३८७८२७,सचिन पांडुळे (अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर) – ९०९६३१३०२२ यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे .