शबनम न्युज : प्रतिनिधी
पुणे : ‘एक्स्प्रेशन्स २०२४’ या तीन दिवसीय सांस्कृतिक आणि व्यवस्थापनशास्त्र विषयक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलचे उदघाटन भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये करण्यात आले.आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे यांच्या हस्ते दि.१४ मार्च रोजी उदघाटन करण्यात आले.उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक यांच्यासह प्राध्यापक वर्ग,संयोजन समिती सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.२६ महाविद्यालयातून ५०० विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत.‘नूर -ए-भारत’ ही या महोत्सवाची संकल्पना आहे.त्यात दि.१४ ते १६ मार्च दरम्यान विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम,भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.