शबनम न्यूज , प्रतिनिधी :
महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची उमेदवारी आमदार रवींद्र धंगेकर यांना जाहीर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन आज भेट घेतली. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार आणि धंगेकर यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
याबाबत पत्रकारांशी संवाद साधतांना धंगेकर यांनी सांगितले कि देशाच्या उभारणीमध्ये शरद पवार यांचे मोठ योगदान असून त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. तर आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, मला पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडून आगामी काळात निवडणुकीकरीता मार्गदर्शन घेतले. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाचा निवडणुकीत नक्किच फायदा होईल. तसेच पुणे लोकसभेत येणार्या काळात सहा विधानसभा मतदारसंघांत होणार्या सभांमध्ये शरद पवार हे उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शनदेखील करणार.