शबनम न्यूज , प्रतिनिधी :
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील येत्या 26 मार्च रोजी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत त्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरोधात परत एकदा शिवाजीराव आढळराव पाटील अशी लोकसभा निवडणूक रंगणार आहे..
Advertisement