शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पाईप नॅचरल गॅस ( PNG) लाईन ,गुरुद्वारा ( वाल्हेकरवाडी चिंचवड ) परिसरात शाखा टाकण्यासाठी तात्काळ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी यांना परवानगी देण्यात यांनी, अशी मागणी कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सुरज गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, ब प्रभाग अधिकारी, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता ब प्रभाग , यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, आम्ही गुरुद्वारा वाल्हेकरवाडी ,चिंचवड परिसर येथे पाईप नॅचरल गॅस टाकण्यासंबंधी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीला मागणी केली होती आमच्या मागणीनुसार , महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचे असिस्टंट मॅनेजर , श्री सुनील पाटील साहेब पीएनजी प्रोजेक्ट यांनी माननीय कार्यकारी अभियंता ब प्रभाग ( स्थापत्य विभाग) यांना दिनांक ५ मार्च 2024 रोजी पत्र दिले आहे या पत्रामध्ये धर्मराज चौक ते गुरुद्वारा परिसर येथे एकमताने पाईप नॅचरल गॅस , पाईपलाईन टाकण्यासंबंधी परवानगी मागितली आहे , आज आपण जर बघितले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तसेच पीएनजी गॅस हा सुरक्षित असून आपण जर पाहिले तर या गॅस मुळे नागरिकांना अखंडीत पुरवठा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय चांगला , रोज कोणतीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आपण ज्याप्रमाणे सिलेंडरची दर महिन्याला रजिस्ट्रेशन करतो त्याप्रमाणे रजिस्ट्रेशनचे गरज नाही , याची गळती व चोरी होणार नाही , वापरल्यानंतरच त्याचे बिल देणे तसेच पेमेंट सुद्धा आपण बँकद्वारे , ड्रॉप बॉक्स, ईसीएस नेट बँकिंग द्वारे करू शकतो यामुळे बरेच फायदे याचे आहेत, असेही सुरज बाबर यांनी नमूद केले आहे.
तसेच हा गॅस मिथेन या संयुगाने बनलेला असून यामध्ये कमी प्रमाणात कार्बन व हायड्रोकार्बन्स असतात हा गॅस कलर व वास विरहित व विषारी नाही व हा गॅस घरगुती तसेच उद्योग व व्यवसायासाठी तसेच वाहनांमध्ये सुद्धा वापरला जातो त्यामुळे पाईप नॅचरल गॅस याचे नेटवर्क (जाळे ) आपण गुरुद्वारा परिसरात टाकण्यास परवानगी लवकरात लवकर दिल्यास याचा फायदा नक्कीच गुरुद्वारा परिसरातील नागरिकांना होईल व दर महिन्याला सिलेंडर रजिस्ट्रेशन करा तसेच यामध्ये होणाऱ्या गळती व चोरी या पासूनही नागरिकांचे संरक्षण होणार आहे व हा गॅस नागरिकांना परवडणारा व सुरक्षित आहे यामुळे तात्काळ यावर कार्यवाही करावी व महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीला परवानगी देण्यात यावी